We will fetch book names as per the search key...
Seller | Price | |
---|---|---|
StoryMirror Best price | ₹180 | |
Amazon | Price not available | |
Flipkart | Price not available |
About the book -
भावभावना,प्रेम, भक्ती यांचा उत्कृष्ट मिलाफ या लेखकथासंग्रहात झालेला दिसतो. मन हे मोगऱ्याच्या रूपापेक्षा त्याच्या गंधावर अधिक भाळते अगदी तसेच या पुस्तकातील विचार, अनुभव याद्वारे मन उल्हासित होते.
मन आणि मोगरा हे नातं अनोखं व तरल, मधूर आहे. लेखिकेच्या लेखनप्रतिभेने मनही सुगंधित व प्रसन्न होते. लेखिकेचा जगाकडे,परमेश्वराकडे बघण्याचा स्वच्छ व निर्मळ दृष्टीकोन प्रतित होतो.लेखांतील विविधता मनःस्पर्शी असुन आपण कुठेही शब्दबंबाळ होत नाही.जग सुंदर आहे हा विश्वास या पुस्तकाने वृद्धिगंत होतो.
About the author - "लेखिकेविषयी-
सौ. स्वरूपा कुलकर्णी
जन्म- छत्रपती संभाजीनगर, भाद्रपद दशमी तिथी,२३ सप्टेंबर १९८५
शिक्षण- B.sc.Computer
अक्षरवेल(२०२३) दिवाळी अंक,Marathi Culture and Festival ,USA (2023)यांचा दिवाळी अंक, अक्षरभेट (२०२३) दिवाळी अंक तसेच श्री उपासनी बाबा , साकुरी यांच्याप्रित्यर्थ निघणाऱ्या षण्मासिकात लेख प्रकाशित आहेत. स्टोरीमिरर प्रकाशित सांजतरंग (काव्यसंग्रह) व अंतरंग मनाचे( कथासंग्रह) या पुस्तकांत कविता व कथा प्रकाशित झाली आहे. तसेच, ""सकाळ"" वृत्तपत्रात कविता व लेख प्रकाशित झाले आहेत.
सोशल मिडीयावर सतत कविता व कथा लेखन चालू असते. सोशल मिडीयावर विविध लेखन स्पर्धांमध्ये सहभाग व बक्षिसे मिळवली आहेत."